ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) App
ई पीक पाहणी मोबाईल अॅप मधून कशी करावी?
Step 1
1. प्रथम मोबाईल मधील Play Store मध्ये जाऊन पीक पाहणी अॅप डाऊनलोड करावे.
2. ई पीक पाहणी मराठी भाषेत असल्याने आवश्यक त्या ठिकाणी मराठी शब्द टाईप करावयची असल्याने Google Indic Keybord हे अॅप मोबाईल मध्ये असल्यास पीक निवड करताना सोपे जाईल.
https://play.google.com/store/apps/details?id=org.mahait.epeek
3. ई पीक अॅप Install केल्यानंतर सर्व लोकेशन चालु करुन इतर सेटिंगसाठी मान्यता दयावी.
4. मोबाईल नंबर टाकावा.
5.नविन खातेदार नोंदनि करावे ह्या बटन वर क्लिक करावे.
Step 3
6. ज्या गावातील ई पीक पाहणी करायची आहे तो जिल्हा, तालुका गाव निवड करावे.
7. शेतकरी यांना नोंदणी करताना खाते नं. सर्वे क्र. पहिले नाव, मधले नाव आडनाव यावरुन देखील करता येईल.
8. योग्य ती माहिती टाकून खातेदार निवडावे.
10. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेनंतर चार अंकी सांकेतांक क्रमांक येईल व नोंदणी झालेल्या शेतकरी यांना सांकेतांक कायम राहील. सांकेतांक लक्षात नसल्यास सांकेतांक विसरालात बटनावर क्लीक केल्यास तात्काळ मिळतो.
11. TAB- परिचय मधील माहिती भरावी
Step 4
12. पीकांची माहिती भरण्यापूर्वी सर्वे नंबर मधील जमीन मिळकतीमध्ये निर्भेळ पीकांची नोंद करण्यापूर्वी जमीनीत कायम क्षेत्र असल्यास, प्रथम कायम पड जमिनीची नोंदणी करुन त्या नंतर पेरणीची माहिती नोंदवा .
13. पिकांची माहिती नोंदवा यावर क्लिक करून माहिती भरावी.
14. TAB पीकांची माहिती भरताना खाते क्र. सर्वे क्र. निवड करावा. लागवडी पो. ख उपलब्ध असेल.
15. हंगाम चालू हंगाम निवड करावा. आंबा फळारीक व जमीन पड/कायम पड असल्यास संपूर्ण वर्ष पर्याय निवड करावा.
16. पीक पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र सात बारा वरील क्षेत्र याठिकाणी दिसेल.
17. पिकांचा वर्ग आपल्या भागात निर्भेळ पीक (एकाच क्षेत्रावर एक पीक भात पीक असल्याने) निर्भेळ पीक प्रकार निवड करावा जर जमीन चालू हंगामामध्ये पड़ असल्यास पड क्षेत्र निवडून फोटो शिवाय माहिती भरावी.
18. पीकांचा प्रकार मध्ये पीक व फळबाग यापैकी एक प्रकार निवड करावे. (भात असल्यास पीक निवड करावे आंबे असल्यास फळबाग निवड करुन क्षेत्र व झाडांची संख्या नमुद करावी)
19. पीक पेरणी क्षेत्र - आपल्या तालुक्यात खरीप हंगामाध्ये निर्भेळ पीक वर्गातील भात पिक क्षेत्राचे मोठया प्रमाणात पीक घेतले जाते प्रत्यक्ष पीक पेरणी/भात लावणी केलेले क्षेत्र शेतकरी भरतील क्षेत्र भरताना आर स्वरुपात भरावे, राबाचे क्षेत्र नये, शेतातील लावणी केलेले भाताचे क्षेत्र भरावे.
1. 20 गुंठे भात पीक क्षेत्र असल्यास 0.2000 असे भरावे (हे. आर चौ. एकक) तर 5 असल्यास 0.0500 असे भरावे, पीकांचे क्षेत्र भरताना सात बारा वरील एकूण क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्र भरता येणार नाही2. सामाईक खातेदारांपैकी कोणत्याही एका खातेदाराने पुर्ण पेरणी क्षेत्र भरले तरी देखील माहिती भरली जाईल किंवा खातेदारांच्या वहिवाटी पुरते देखील क्षेत्र भरता येईल.
२०. जलसिंचन साधन आपल्याकडील पीके जिरायती (पावसाच्या पाण्यावर असल्यामुळे अजलसिंचित जिरायत हा पर्याय निवडावा मात्र काही जमीनीना विहीर, बोअरवेअ.शेततळे यामधून पाणी दिले जात असल्यास योग्य पर्याय निवड करावा.
२१. जलसिंचन पध्दत पीकांना कश्याप्रकारे पाणी दिले जाते? यामध्ये तुषार, ठिंबक सिंचन पध्दत, प्रवाही सिंचन पध्दत निवड करावी.
२२. लागवडीचा दिनांक - शेतकरी याठिकाणी भात लावणी केलेला दिनांक नमूद करतील.
२३ . मुख्य पिकाचे छायाचित्र जो स नं निवड केलेला आहे त्यांच स मध्ये बांधापासून आतमध्ये जाऊन शेतात उभेपीक असताना फोटो काढावा,मोबाईल गॅलरी मधील फोटो अपलोड करता येणार नाही यांची नोंद घ्यावी. (ज्या शेत जमीनीत उभे आहोत तो सं न निवडणे, त्याव्यतिरिक्त स नं निवड केल्यास पीक पाहणी अपुर्ण होईल)
२४. सबमिट करा बटन वर क्लिक करून सबमिट करावे.
२५. पिकांची माहिती वर क्लिक करून भरलेल्या पिकांची माहिती आणि स्थिति पहावी.
2६ TAB कायम पड:- सदर क्षेत्रांचा फोटो काढता देखील माहिती भरता येते. याठिकाणी जलसिंचनाचे साधन भरण्यास उपलब्ध होणार नाही. 59 प्रकारची कायम पड फोटो शिवाय माहिती भरता येईल.
2७. TAB बांधावरील झाडे बांधावरील झाडाचे नाव निवडने संख्या नमुद करणे, फोटो काढून सबमिट करावे.
2८. TAB अपलोड : शेतावर गेल्यानंतर मोबाईल मध्ये इंटरनेट नसल्यास चार अंकी सांकेतांक क्रमाक नमूद करुन लॉगीन करावे, पीक लागवडीची माहिती भरुन पोकांचा फोटो काढुन सबमिट करावा गावात इंटरनेट क्षेत्रात आल्यानंतर अपलोड या टॅब चा वापर करुन पीक पेरा भरावा.
2९. एका खातेदारांची ई पीक पाहणी पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या खातेदाराची पीक पाहणी करण्यासाठी मोबाईल अँप मधील नवीन खातेदार नोंदणी करा टॅब वापर करावा. एका मोबाईल क्रमांक वरुन 20 खातेदारांची नोंदणी करुन पीक पाहणी करता येईल.
How To Check Payment Status #Hafta / Installment Of PM KISAN SAMMAN NIDHI Yojana